Saturday, August 28, 2021

ज्ञानाहार रेस्टॉरंट

 जेवण व नाश्ता समजून विद्यार्थी करतात अभ्यास


खंडाळा शाळेने उघडले ज्ञानाहार रेस्टॉरंट


खंडाळा -

कोविड च्या संसर्ग भितीमुळे राज्यातील प्राथमिक शिक्षण संस्था बंद आहेत. विद्यार्थी अध्ययनरत राहावा म्हणून तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा ने विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाहार रेस्टॉरंट सुरु केले आहे.

या उपक्रमामुळे खंडाळा येथील विद्यार्थ्यांना घराजवळ शिक्षण सुविधा उपलब्ध झाली आहे.शाळा बंद असल्याने ऑफलाईन शिक्षण देण्यासाठी येणारे अडथळे दूर करण्यासाठी स्थानिक शिक्षकांनी रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या द्रोण, पत्रावळी, कागदी प्लेट वर इयत्ता एक ते सातच्या अभ्यासाचे लेखन करून विद्यार्थ्यांना अभ्यास जेवण व नाश्ता रूपात उपलब्ध करून दिला आहे.

पुस्तकातील आशय, स्वाध्याय पत्रावळीवर लेखन करून खंडाळा येथील शिक्षकांनी वेगळ्या पद्धतीने अभ्यासाची आवड विद्यार्थ्यांत ज्ञानाहार रेस्टॉरंट उपक्रमातून निर्माण केली आहे.ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणात असंख्य अडथळे येत आहेत. त्यावर मात करण्यासाठी शाळेच्या वतीने आतापर्यंत रेडिओ खंडाळा, स्वाध्यायमाला, निसर्गयात्रा,ऑनलाईन टेस्ट, मोहल्ला शाळा असे उपक्रम शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने राबविले. ज्ञानाहार रेस्टॉरंट तयार करण्यासाठी शिक्षण तज्ज्ञ सदस्य दिनकर धूळ यांनी जागा उपलब्ध करून दिली. तेथून विद्यार्थी ज्ञानाहार घेऊन घरी अभ्यास करतात.

गणितीय क्रिया, भाषा व्याकरण, इंग्रजी, विज्ञान, भौगोलिक माहिती, इतिहास विषयासंबंधी सोप्याकडून कठीणकडे जाणाऱ्या स्वाध्याय कृती ज्ञानाहार रेस्टॉरंट मधे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासह अभ्यासपूरक वाचनीय पुस्तके येथे ठेवण्यात आली आहेत. ज्याचा उपयोग गृहकार्य करण्यासाठी विद्यार्थी आवडीने करीत आहेत.

कोविड संसर्ग नियम लक्षात घेऊन केंद्रप्रमुख गजानन गायगोळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शैला खंडेराव, उपाध्यक्ष प्रशांत आंबूसकर, शिक्षणतज्ज्ञ दिनकर धूळ, सदस्य संतोष वैतकार यांच्या सहकार्याने गावातील विद्यार्थी आनंदाने अध्ययनरत राहावे यासाठी ज्ञानरचनावादी पद्धतीने सुरु केलेल्या

ज्ञानाहार रेस्टॉरंट उपक्रमाबद्दल मुख्याध्यापिका शीला टेंभरे, श्रीकृष्ण वाकोडे,ओमप्रकाश निमकर्डे, तुलसीदास खिरोडकार,राजेंद्र दिवनाले,सुरेखा हागे, गोपाल मोहे,निखिल गिऱ्हे यांचे शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी कौतुक केले आहे.


नियमित शिकण्याच्या साहित्यासोबत वेगळी शैक्षणिक साधने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्यास ते आनंदाने अभ्यास करतात.

ह्या अनुभवातून ज्ञानाहार रेस्टॉरंट सुरु केले.त्याला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.


---तुलसीदास खिरोडकार

प्रयोगशील शिक्षक, खंडाळा







नवोदय परीक्षा पूर्वतयारी वर्ग

 *नवोदय वि‌द्यालय प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारी वर्गाचे उ‌द्घाटन*  हिवरखेड (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी,...