विज्ञान प्रदर्शन /Inspire Project

             11 व 12 डिसेंबर 2024 रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये सहायक अध्यापिका सौ. सुरेखा ब्रम्हदेव हागे यांनी तयार केलेली प्रतिकृती खेळातून विज्ञान पर्यावरण प्राथमिक शिक्षक गटातून निवडून जिल्हास्तरासाठी पात्र ठरली. तसेच विद्यार्थी गटातून प्रज्वल महेश जाधव व सुरज प्रशांत आंबुसकार यांनी बनवलेल्या धान्य गाळणी यंत्र या प्रतिकृतीला प्रोत्साहनपर बक्षीस प्राप्त झाले. तेल्हारा पं. स. चे गटशिक्षणाधिकारी श्री. दिनेश दुतंडे व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी केंद्रप्रमुख गोपाल मोहे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र तायडे, उपाध्यक्ष सौ. शितलताई पाटोळे, सर्व सदस्य, मुख्याध्यापक सौ. शीलाताई टेंभरे, सहायक शिक्षक श्रीकृष्ण वाकोडे, राजेंद्र दिवनाले, निखिल गिऱ्हे,सुभाष कवटकार व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.


       

  Inspire Award 2023 - 2024

  Inspire Award 2023 - 24 अंतर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा येथील प्रतिकृतीची निवड. 

     तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा येथील इयत्ता सहावी मधील प्रज्वल महेश जाधव या विद्यार्थ्याने बनवलेल्या 'मल्टीपर्पज फर्टीलायझर पंप' या प्रतिकृतीची निवड करण्यात आली. पिकांच्या वाढीच्या अवस्थेत पिकांना खत देताना ते पानांवर पडते. त्यामुळे पिकांचे नुकसान होते. यासाठी बहुउपयोगी असलेले मल्टीपर्पज फर्टीलायझर पंप हे यंत्र वापरल्यामुळे पिकाच्या मुळाशी खत पडते. त्यामुळे पिकांचे नुकसान होत नाही. सदर यंत्राचा उपयोग ड्रिंचिंगसाठीसुद्धा करता येतो. सदर यंत्र बनवण्यासाठी खर्चही एकदम कमी येतो. शेतकऱ्यांच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामधूनच सदर यंत्र सहज तयार करता येते.

              प्रज्वल महेश जाधव या विद्यार्थ्याने बनवलेल्या प्रतिकृती निर्मितीसाठी विज्ञान शिक्षक गोपाल मोहे व सौ. सुरेखा ब्रम्हदेव हागे यांनी मार्गदर्शन केले. इन्स्पायर अवार्ड मिळाल्याबद्दल केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक सौ. शीला विनोदराव टेंभरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनकर धुळ, उपाध्यक्ष नरेश पिलांत्रे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सहायक शिक्षक श्रीकृष्ण वाकोडे, ओमप्रकाश निमकर्डे, तुलसीदास खिरोडकार, राजेंद्र दिवनाले, निखिल गिऱ्हे व सुभाष कवटकार यांनी कौतुक केले. तेल्हारा तालुक्यातील यावर्षी एकूण चार प्रतिकृतींची निवड इन्स्पायर अवार्ड करिता करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा परिषद केंद्र शाळा खंडाळा जिल्हा परिषदेची एकमेव शाळा आहे.

           


       


                    

   Inspire Award List 2023-24 Click Here
                         सर्टिफिकेट 👇👇

=========================================

दि. 27 व 28 डिसेंबर 2023 रोजी स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ तेल्हारा येथे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये जिल्हा परिषद केंद्र शाळा खंडाळा येथील फळ तोडणी यंत्र या प्रतिकृतीस तिसरा क्रमांक मिळाला. 

सहभागी विद्यार्थी - प्रज्वल महेश जाधव    वर्ग 6 वा 

                           सार्थक संतोष पिलांत्रे  वर्ग 6 वा 




         मा. डॉ. सुचिता पाटेकर मॅडम शिक्षणाधिकारी जि. प. अकोला ( जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन, मूर्तिजापूर ) 

                       =====================

          दि . 06 व 07 जानेवारी 2023 रोजी संपन्न झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा येथील विदयार्थ्यांनी शैक्षणिक खेळ ही प्रतिकृती सादर केली. शाळेमधील शुभाशिष दिनेश खंडेराव व करण देवानंद पाटोळे या विद्यार्थ्यांनी प्रतिकृतीचे उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. सोबतच सहायक शिक्षक गोपाल मोहे यांनी सादर केलेल्या 'माझी शाळा माझी दिनदर्शिका' या प्रतिकृतीला प्राथमिक शिक्षक गटातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला. या प्रतिकृतीची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली. 

          शाळेत मुख्याध्यापिका सौ. शीलाताई टेंभरे, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले. 




            =======================

        


Inspire Award List 2020-21 Click Here
सर्टिफिकेट 👇👇


विद्यार्थी नाव - कु. ईश्वरी गजानन गोलाईत वर्ग 7 वा 
मार्गदर्शक - सौ. सुरेखा ब्रम्हदेव हागे स. अ. 
सन 2020 - 2021


केळी च्या कचऱ्यापासून अन्नद्रव्य निर्मिती 

फुलशेती फुलवण्यासाठी होणार फायदा 

खंडाळा - 
 केळी या पिकापासून निर्माण होणारा कचरा,साली अस्ताव्यस्त पडल्यामुळे पर्यावरणाला धोका तसेच आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. यावर उपाय करत कचऱ्याचा उपयोगातून अन्नद्रव्य निर्मिती करण्याचा प्रोजेक्ट खंडाळा शाळेच्या विद्यार्थिनीने भारत सरकार च्या विज्ञान व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला सादर केला त्याची निवड इन्स्पायर अवार्ड साठी करण्यात आली आहे. 
 राष्ट्रीय स्तरावर इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून  वैज्ञानिक तंत्रज्ञानात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन भारत सरकार द्वारा प्रोत्साहित केल्या जाते. यावर्षी इंस्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनी साठी तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा येथील इयत्ता सातवी ची विद्यार्थिनी ईश्वरी गजानन गोलाईत हिच्या केळी पिकावर आधारित क्लीन इंडिया, वेस्ट फॉर बेस्ट ह्या प्रोजेक्टची निवड झाल्याने आनंद व्यक्त करण्यात आला आहे.केळी कचऱ्यापासून पोटॅशियम निर्मिती करुन फूल शेती संवर्धन करण्यासाठी विशेष करुन या प्रोजेक्ट मधे दखल घेण्यात आली आहे.
   सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या खंडाळा परिसरात बहुसंख्य शेतकरी केळी या पिकांची लागवड करतात. केळी कटाई नंतर उर्वरित झाड व पाने ,केळीची साल यांची विल्हेवाट योग्यरीतीने करून अन्नद्रव्य निर्मितीकरून फूलशेती व पिकांना पोषक घटक तसेच स्वच्छ भारत अभियान ला हातभार लावण्यासंदर्भात प्रोजेक्टमध्ये सुचित करण्यात आले आहे.प्रोजेक्टच्या निर्मितीसाठी विशेष मार्गदर्शन परिसर व विज्ञान उपक्रम प्रमुख अध्यापिका सुरेखा हागे , गोपाल मोहे, निखील गिऱ्हे व वर्गशिक्षक तुलसीदास खिरोडकार यांनी केले आहे. 
   कोरोना महामारी च्या काळातही विद्यार्थ्यांना सातत्याने अध्ययनरत ठेवण्यासाठी रेडिओ खंडाळा , मोहल्ला शाळा ,बोलक्या भिंती,स्वाध्यायमाला ,कृतीपत्रिका,परिसर व विज्ञान असे विविध उपक्रम शाळेच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. इंस्पायर अवार्ड साठी प्रोजेक्ट ची निवड झाल्याबद्दल ईश्वरी चे केंद्रप्रमुख गजानन गायगोळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शैला खंडेराव उपाध्यक्ष प्रशांत आंबुसकर, शिक्षण तज्ज्ञ  दिनकर धुळ, मुख्याध्यापिका शीला टेंभरे, श्रीकृष्ण वाकोडे, ओमप्रकाश निमकर्डे,राजेंद्र दिवनाले यांनी कौतुक केले आहे.



 विद्यार्थ्यात वैज्ञानिक जाणीव जागृती व नवनिर्मिती साठी विविध उपक्रम परिसर व नैसर्गिक घटकांचा उपयोग करून राबविले जातात.
सौ.सुरेखा ब्रम्हदेव हागे ,उपक्रम प्रमुख परिसर व विज्ञान

===================================

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2019-2020














No comments:

Post a Comment

नवोदय परीक्षा पूर्वतयारी वर्ग

 *नवोदय वि‌द्यालय प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारी वर्गाचे उ‌द्घाटन*  हिवरखेड (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी,...