सामान्य ज्ञान

                      🔷 महाराष्ट्र राज्य 🔷

      महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्राची राजधानी मुंबई असून उपराजधानी नागपूर आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. राज्यातील सर्वात लांब नदी गोदावरी नदी आहे. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. महाराष्ट्रात एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे 288 सदस्य आमदार म्हणून निवडून येतात ; तर एक सदस्य अँग्लोइंडियन सदस्य नामनिर्देशित करता येतो. महाराष्ट्रात विधानपरिषद अस्तित्वात असून या सभागृहाची सदस्यसंख्या 78 आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे  हिवाळी अधिवेशन नागपूर येथे भरते. 

                      🔸 महाराष्ट्र राज्य नकाशा 🔸


💠 महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग 💠

महाराष्ट्रात सहा प्रशासकीय विभाग आहेत. 






===================================

🔴 अकोला जिल्हा 🔴

अमरावती प्रशासकीय विभागामध्ये अकोला जिल्हा येतो. अकोला जिल्ह्यात अकोला, बाळापूर, अकोट, बार्शीटाकळी, तेल्हारा, मूर्तिजापूर व पातूर असे सात तालुके आहेत. 
अकोला जिल्ह्यात अकोला, बाळापूर, अकोट व मूर्तिजापूर असे चार उपविभाग आहेत. अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे.जिल्ह्याच्या ठिकाणी महाबीजचे मुख्यालय आहे. तसेच सरकारी मेडिकल कॉलेज आहे.बाभुळगाव येथे नवोदय विद्यालय आहे.अकोला येथे असदगड किल्ला असून बाळापूर येथे प्रसिद्ध किल्ला आहे. अकोट तालुक्यात प्रसिद्ध नरनाळा किल्ला आहे. जिल्ह्यात सिंचनासाठी अनेक लघु व मध्यम सिंचन प्रकल्प आहेत. शिवणी येथे विमानतळ आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 अकोला जिल्ह्यामधून जातो. पारस येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे. अकोला जिल्ह्यात एक लोकसभा मतदारसंघ असून अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट, बाळापूर व मूर्तिजापूर असे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. अकोला शहरासाठी महानगरपालिका अस्तित्वात आहे. अकोला जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर व ज्वारी ही मुख्य पिके घेतली जातात. 

🔸 अकोला जिल्हा नकाशा 🔸

====================================





                                                               



No comments:

Post a Comment

नवोदय परीक्षा पूर्वतयारी वर्ग

 *नवोदय वि‌द्यालय प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारी वर्गाचे उ‌द्घाटन*  हिवरखेड (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी,...