समाज शिक्षणाची वाट शिक्षकांनी अंगीकारावी
- सत्यपाल महाराज
आदर्श जगणं शिकवणाऱ्या शिक्षकांना जागर शिक्षक गौरव पुरस्कार वितरण
तेल्हारा
विद्यार्थ्यांना दर्जेदार शालेय शिक्षण देण्यासोबतच समाज शिक्षणची वाट शिक्षकांनी अंगीकारून आदर्श समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्याचे प्रतिपादन राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी व्यक्त केले.
जागर फाउंडेशन द्वारा आयोजित आदर्श जगणं शिकवणाऱ्या शिक्षकांना जागर शिक्षक गौरव पुरस्कार वितरण समारंभात सत्यपाल महाराज बोलत होते. अकोला जिल्ह्यातील
विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्था बळकट करणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना तेल्हारा येथे आयोजित कार्यक्रमात गौरवण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक किशोर भागवत होते. व्याख्याते आमदार अमोल मिटकरी, ज्येष्ठ लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले, गझलकार किशोर बळी, दूरदर्शन प्रतिनिधी विशालराजे बोरे,गोपाल भुजबले, प्रा. प्रदीप ढोले, डॉ. निलेश वानखडे यांची विशेष उपस्थिती तर प्रमुख अतिथी म्हणून मनोहर शेळके, दीपक दही, राजेश वानखडे, सुभाष ढोकणे,शंकर तायडे,असलम खान पठाण, प्रमोद पोके, अमोल ढोकणे उपस्थित होते .
जागर फाउंडेशनच्या वतीने अकोला जिल्ह्यातील अरुण रामकृष्ण निमकर्डे , सोहन नामदेव दामधर, साधना श्यामशील भोपळे, संघदास भगवान वानखडे,वंदना प्रतापसिंह सोळंके, विश्वेश्वर राजेश्वर पातुर्डे,मनोज ज्ञानदेव पिंगळे,राजाराम मनोहर म्हैसने, कु.पौर्णिमा लक्ष्मीनारायण शर्मा, कु.विजया उत्तमराव खंडारे, कु. नयना शामराव कळंबे, कु.अपर्णा मोतीराम इंगळे, सौ.सविता गजानन देशमुख, पवन प्रल्हादराव ठाकूर,अमोल गणेशराव राखोंडे, प्रफुल्ल हरिभाऊ वसो, निखिल सुरेशराव गिऱ्हे, नाजिमोद्दीन नासीरोद्दीन,हमीद हुसेन लियाकत हुसेन, कपिल मुरलीधर इंगळे, अमर भागवत, वजाहत अलीम ह्या उपक्रमशील शिक्षकांना सन्मान चिन्ह, सन्मान पत्र व पुस्तक संच भेट देऊन आमदार अमोल मिटकरी व प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या हस्ते जागर शिक्षक गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वागतासाठी फुलांचा वापर न करता पुस्तकांचा वापर करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जागर फाउंडेशनचे संयोजक किशोर बळी ,संचालन उमेश तिडके तर आभार गोपाल मोहे यांनी मानले. शिक्षक गौरव पुरस्कार कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. नंदकिशोर चिपडे, तुलसीदास खिरोडकार दीपक पोके, निखिल गिऱ्हे,प्रवीण चिंचोळकर, राजेंद्र दिवनाले,प्रफुल्ल चिमणकार, अजय पाटील,ओमप्रकाश उगले,शीला टेंभरे,सुरेखा हागे यांनी पुढाकार घेतला.
No comments:
Post a Comment