🔸 खंडाळा ता तेल्हारा जि. अकोला 🔸
खंडाळा हे गाव तेल्हारा तालुक्यात असून जिल्हा अकोला आहे. खंडाळा गावात ग्रामपंचायत असून सदस्यसंख्या 9 आहे. खंडाळा गाव तेल्हारा येथून 20 कि. मी. अंतरावर असून अकोला येथून 65 कि. मी. अंतरावर आहे. गावात पोस्ट ऑफिस असून पिन कोड 444 103 आहे. येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. खंडाळा गावात संत्रा व केळीची शेती मोठया प्रमाणात केली जाते.
गावात प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या ( मराठी व उर्दू माध्यम ) दोन शाळा असून एक माध्यमिक शाळा आहे. गावात केंद्र शाळा आहे. उच्च शिक्षणासाठी मुले हिवरखेड, तेल्हारा, अकोट व अकोला येथे जातात. 2011 च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या 2214 आहे. खंडाळा गावाचे क्षेत्रफळ 928.51 हेक्टर आहे. खंडाळा गाव अडगांव बु. जि. प. क्षेत्रात येत असून खंडाळा पं. स. गण आहे. खंडाळा हे गाव हिवरखेड - अकोट या जिल्हा मार्गांपासून उत्तरेकडे 1 कि. मी. अंतरावर आहे. खंडाळा गावात दर बुधवारी आठवडी बाजार भरतो. गावात राष्ट्रीयकृत बँक नाही.
No comments:
Post a Comment