व्हिडीओ 👇👇
विदर्भ एक्स्प्रेस न्युज Click Here
खंडाळा येथे कोरोना लसीकरण जनजागृती
हर घर दस्तक मोहिम
खंडाळा -
कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी हर घर दस्तक मोहिमेअंतर्गत तेल्हारा तालुक्यातील खंडाळा येथे जनजागृती करण्यात आली. कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेपासून संरक्षण मिळवण्यासाठी लस घेणे अत्यावश्यक आहे. गावात एकही डोज न घेतलेल्या नागरिकांच्या भेटीदरम्यान त्यांचे समुपदेशन जिल्हा ॲम्बॅसेडर जव्वाद हुसेन व तालुका ॲम्बॅसेडर असलम खान पठाण यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
यावेळी लोकांना कोरोना लसीकरणाचे महत्व सांगण्यात आले.आरोग्य उपकेंद्र खंडाळा येथे आज लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी पहिला डोस व दुसरा डोस घेतला.शाळेतील शिक्षक, आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांनी कामकाज पाहिले. यावेळी दोन्ही डोज घेतलेल्या नागरिकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच इतरही लोकांनी लस घ्यावी यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष शे. इस्माईल, मुख्याध्यापक शीला टेंभरे, शारिक अली सहायक शिक्षक श्रीकृष्ण वाकोडे, ओमप्रकाश निमकर्डे, तुलसीदास खिरोडकार, सुरेखा हागे, राजेंद्र दिवनाले, गोपाल मोहे, निखिल गिऱ्हे, मो. अन्सार तसेच आशा सेविका मीनाक्षी इंगळे, वंदना तेलगोटे व अंगणवाडी सेविका प्रतिभा गावंडे, वैशाली तायडे, मदतनीस वनमाला गोलाईत, निर्जला अवचार उपस्थित होते.
नागरिकांना कोरोना लस घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.