ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्यातून विद्यार्थ्यांचे शिक्षण गतिमान होते.
केंद्रप्रमुख गजानन गायगोळ यांचे प्रतिपादन
तेल्हारा अकोला दि. १७ डिसेंबर 2021 - शुक्रवार
कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य शिक्षण गतिमान होण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात असे प्रतिपादन केंद्रप्रमुख गजानन गायगोळ यांनी खंडाळा केंद्रस्तरीय ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य प्रदर्शन प्रसंगी व्यक्त केले.यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका शीला टेंभरे,प्रमुख अतिथी म्हणून गजानन काळपांडे, कलीम सर, नितीन तराळे, सुनीता वानखडे उपस्थित होते.
तेल्हारा तालुक्यातील खंडाळा केंद्र अंतर्गत येणाऱ्या शाळातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनीमध्ये विविध ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य मांडणी करून उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
याच कार्यक्रमात जिल्हा प्रशासनाद्वारे आयोजित कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत जनजागृती मोहिमेत सहभाग घेणाऱ्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. बालरक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शालेय प्रवाहात आणणार्या बालरक्षक श्रीकृष्ण भड, श्रीराम भोपळे, उमेश तिडके, अमोल राखोंडे, प्रमोद दाते, ओमप्रकाश पांडव, तुलसीदास खिरोडकार यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शैक्षणिक संशोधन परिषद पुणे कडून प्राप्त सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
आयोजित प्रदर्शनीमध्ये खंडाळा केंद्रातील विजय ढोकणे, देविदास कोहरे, दीपक पोके, प्रवीण चोपडे, संजय गासे, श्रीकृष्ण वाकोडे, ओमप्रकाश निमकर्डे, राजेंद्र दिवनाले,प्रमोद रेखाते, संतोष गावंडे, शारिक अली, मो. अन्सार यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन उपक्रमशील शिक्षक गोपाल मोहे तर आभार प्रदर्शन निखिल गिऱ्हे यांनी केले.