Tuesday, February 22, 2022

शिवजयंतीनिमित्त रंगभरण व सामान्य ज्ञान स्पर्धा

        जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा व इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. 

         स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. दोन्ही स्पर्धेतील विजय स्पर्धकांना शिवजयंतीनिमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शीला टेंभरे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शारीक अली, सहायक अध्यापक श्रीकृष्ण वाकोडे, ओमप्रकाश निमकर्डे, तुलसीदास खिरोडकार, सौ. सुरेखा हागे, राजेंद्र दिवनाले, गोपाल मोहे, निखिल गिऱ्हे व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. 

Tuesday, February 15, 2022

शिवजयंतीनिमित्त मानवतेचा सन्मान पुरस्कार

 शिवजयंतीनिमित्त मानवतेचा सन्मान पुरस्कार खंडाळा येथील प्रयोगशील शिक्षक तुलसीदास खिरोडकार यांना जाहीर 

           मनःपूर्वक अभिनंदन 🌷🌷🌷🌷







नवोदय परीक्षा पूर्वतयारी वर्ग

 *नवोदय वि‌द्यालय प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारी वर्गाचे उ‌द्घाटन*  हिवरखेड (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी,...