दाखलपात्र लेकरांना दिली ज्ञानाची दिक्षा
खंडाळा येथे शाळापूर्व तयारी मेळावा
खंडाळा
इयत्ता पहिलीमध्ये दाखलपात्र लेकरांना जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्रशाळा खंडाळा येथे ज्ञानाची दिक्षा देऊन शाळेत प्रवेश देण्यात आला. या निमित्ताने पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.
दाखल पात्र विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास
भाषा विकास, बौद्धिक विकास, ह्या क्षमता तपासणी करून त्यांच्या सद्यस्थितीबद्दल नोंदी घेण्यात आल्या. मेळाव्याचे उदघाटन फीत कापून व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनकर धुळ यांनी केले. दोन महिन्याच्या उन्हाळी सुटीत पालक, शिक्षक व स्वयंसेवक यांच्या सहकार्याने पूर्ण करावयाच्या कृती पुस्तिका इयत्ता पहिलीत दाखल विद्यार्थ्यांना वितरित करून शाळा प्रवेश देण्यात आला.
मेळावा व बालकांच्या शाळेत प्रथम आगमन दिनानिमित्त शाळेत सजावट करून सजवण्यात आले होते. बालक पालक मेळावा यशस्वीतेसाठी व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष नरेश पिलांत्रे, विद्या जाधव, मुख्याध्यापक शीला टेंभरे, अध्यापक श्रीकृष्ण वाकोडे, ओमप्रकाश निमकर्डे, सुरेखा हागे, राजेंद्र दिवनाले, अंगणवाडी सेविका वैशाली तायडे, प्रतिभा गावंडे, निर्जला अवचार यांनी बालकांच्या क्षमता चाचणी घेण्यास पुढाकार घेतला. मेळाव्याचे ध्येय प्रास्ताविक अध्यापक तुळशिदास खिरोडकार, संचलन निखिल गिऱ्हे तर आभार गोपाल मोहे यांनी मानले.