खंडाळा शाळेला अकोला जिल्हास्तरीय स्वच्छता विद्यालय पुरस्कार
भारत सरकारच्या वतीने देण्यात येणारा स्वच्छता विद्यालय पुरस्कार योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील स्वच्छता विषयक जाणीव जागृती तथा व्यवस्थापन करणाऱ्या शाळांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वच्छता विद्यालय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा या शाळेला स्वच्छताविषयक उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापनासाठी जिल्हास्तरीय तीन पुरस्कार जिल्हाधिकारी निमा अरोरा, मुख्य कार्यपालन अधिकारी सौरव कटियार, शिक्षणाधिकारी (माध्य ) डॉ. सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी (प्राथ )डॉ. वैशाली ठग यांच्या हस्ते.देऊन सन्मानित करण्यात आले.
खंडाळा शाळेचे मानांकन राज्यस्तरीय स्वच्छता विद्यालय पुरस्कारासाठी झाले असून अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्रशासनाची मराठी माध्यमाची राज्यस्तरीय मानांकन मिळालेली ही एकमेव शाळा आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता विषयक जाणीव जागृती निर्माण करणे सोबतच पाणी व्यवस्थापन, याबाबत केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव प्रशासनाच्या वतीने करण्यात आला, गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या केंद्रप्रमुख गजानन गायगोळ, मुख्याध्यापिका सौ शीला टेंभरे, अध्यापक श्रीकृष्ण वाकोडे, ओमप्रकाश निमकर्डे, सुभाष कवठकार, तुळशीदास खिरोडकार, राजेंद्र दिवनाले, सुरेखा हागे, गोपाल मोहे,, निखील गिऱ्हे यांच्या धडापडीचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.