Sunday, September 19, 2021

जागर फाउंडेशन अकोला तर्फे आयोजित ' जागर शिक्षक गौरव पुरस्कार ' 2021 पुरस्कार वितरण शनिवार दि. 18 सप्टेंबर 2021

 समाज शिक्षणाची वाट शिक्षकांनी अंगीकारावी 

- सत्यपाल महाराज


आदर्श जगणं शिकवणाऱ्या शिक्षकांना जागर शिक्षक गौरव पुरस्कार वितरण 


तेल्हारा


विद्यार्थ्यांना दर्जेदार शालेय शिक्षण देण्यासोबतच समाज शिक्षणची वाट शिक्षकांनी अंगीकारून आदर्श समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्याचे प्रतिपादन राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी व्यक्त केले.

 जागर फाउंडेशन द्वारा आयोजित आदर्श जगणं शिकवणाऱ्या शिक्षकांना जागर शिक्षक गौरव पुरस्कार वितरण समारंभात सत्यपाल महाराज बोलत होते. अकोला जिल्ह्यातील

विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्था बळकट करणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना तेल्हारा येथे आयोजित कार्यक्रमात गौरवण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक किशोर भागवत होते. व्याख्याते आमदार अमोल मिटकरी, ज्येष्ठ लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले, गझलकार किशोर बळी, दूरदर्शन प्रतिनिधी विशालराजे बोरे,गोपाल भुजबले, प्रा. प्रदीप ढोले, डॉ. निलेश वानखडे यांची विशेष उपस्थिती तर प्रमुख अतिथी म्हणून मनोहर शेळके, दीपक दही, राजेश वानखडे, सुभाष ढोकणे,शंकर तायडे,असलम खान पठाण, प्रमोद पोके, अमोल ढोकणे  उपस्थित होते .

 जागर फाउंडेशनच्या वतीने अकोला जिल्ह्यातील अरुण रामकृष्ण निमकर्डे , सोहन नामदेव दामधर, साधना श्यामशील भोपळे, संघदास भगवान वानखडे,वंदना प्रतापसिंह सोळंके, विश्वेश्वर राजेश्वर पातुर्डे,मनोज ज्ञानदेव पिंगळे,राजाराम मनोहर म्हैसने, कु.पौर्णिमा लक्ष्मीनारायण शर्मा, कु.विजया उत्तमराव खंडारे, कु. नयना शामराव कळंबे, कु.अपर्णा मोतीराम इंगळे, सौ.सविता गजानन देशमुख, पवन प्रल्हादराव ठाकूर,अमोल गणेशराव राखोंडे, प्रफुल्ल हरिभाऊ वसो, निखिल सुरेशराव गिऱ्हे, नाजिमोद्दीन नासीरोद्दीन,हमीद हुसेन लियाकत हुसेन, कपिल मुरलीधर इंगळे, अमर भागवत, वजाहत अलीम ह्या उपक्रमशील शिक्षकांना सन्मान चिन्ह, सन्मान पत्र व पुस्तक संच भेट देऊन आमदार अमोल मिटकरी व प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या हस्ते जागर शिक्षक गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.





 कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वागतासाठी फुलांचा वापर न करता पुस्तकांचा वापर करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जागर फाउंडेशनचे संयोजक किशोर बळी ,संचालन उमेश तिडके तर आभार गोपाल मोहे यांनी मानले. शिक्षक गौरव पुरस्कार कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. नंदकिशोर चिपडे, तुलसीदास खिरोडकार दीपक पोके, निखिल गिऱ्हे,प्रवीण चिंचोळकर, राजेंद्र दिवनाले,प्रफुल्ल चिमणकार, अजय पाटील,ओमप्रकाश उगले,शीला टेंभरे,सुरेखा हागे यांनी पुढाकार घेतला.

दै. नवराष्ट्र 

दै. भास्कर 

दै. जनमाध्यम 
दै. सकाळ 
दै. मातृभूमी 
दै. लोकमत 









Saturday, August 28, 2021

ज्ञानाहार रेस्टॉरंट

 जेवण व नाश्ता समजून विद्यार्थी करतात अभ्यास


खंडाळा शाळेने उघडले ज्ञानाहार रेस्टॉरंट


खंडाळा -

कोविड च्या संसर्ग भितीमुळे राज्यातील प्राथमिक शिक्षण संस्था बंद आहेत. विद्यार्थी अध्ययनरत राहावा म्हणून तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा ने विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाहार रेस्टॉरंट सुरु केले आहे.

या उपक्रमामुळे खंडाळा येथील विद्यार्थ्यांना घराजवळ शिक्षण सुविधा उपलब्ध झाली आहे.शाळा बंद असल्याने ऑफलाईन शिक्षण देण्यासाठी येणारे अडथळे दूर करण्यासाठी स्थानिक शिक्षकांनी रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या द्रोण, पत्रावळी, कागदी प्लेट वर इयत्ता एक ते सातच्या अभ्यासाचे लेखन करून विद्यार्थ्यांना अभ्यास जेवण व नाश्ता रूपात उपलब्ध करून दिला आहे.

पुस्तकातील आशय, स्वाध्याय पत्रावळीवर लेखन करून खंडाळा येथील शिक्षकांनी वेगळ्या पद्धतीने अभ्यासाची आवड विद्यार्थ्यांत ज्ञानाहार रेस्टॉरंट उपक्रमातून निर्माण केली आहे.ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणात असंख्य अडथळे येत आहेत. त्यावर मात करण्यासाठी शाळेच्या वतीने आतापर्यंत रेडिओ खंडाळा, स्वाध्यायमाला, निसर्गयात्रा,ऑनलाईन टेस्ट, मोहल्ला शाळा असे उपक्रम शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने राबविले. ज्ञानाहार रेस्टॉरंट तयार करण्यासाठी शिक्षण तज्ज्ञ सदस्य दिनकर धूळ यांनी जागा उपलब्ध करून दिली. तेथून विद्यार्थी ज्ञानाहार घेऊन घरी अभ्यास करतात.

गणितीय क्रिया, भाषा व्याकरण, इंग्रजी, विज्ञान, भौगोलिक माहिती, इतिहास विषयासंबंधी सोप्याकडून कठीणकडे जाणाऱ्या स्वाध्याय कृती ज्ञानाहार रेस्टॉरंट मधे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासह अभ्यासपूरक वाचनीय पुस्तके येथे ठेवण्यात आली आहेत. ज्याचा उपयोग गृहकार्य करण्यासाठी विद्यार्थी आवडीने करीत आहेत.

कोविड संसर्ग नियम लक्षात घेऊन केंद्रप्रमुख गजानन गायगोळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शैला खंडेराव, उपाध्यक्ष प्रशांत आंबूसकर, शिक्षणतज्ज्ञ दिनकर धूळ, सदस्य संतोष वैतकार यांच्या सहकार्याने गावातील विद्यार्थी आनंदाने अध्ययनरत राहावे यासाठी ज्ञानरचनावादी पद्धतीने सुरु केलेल्या

ज्ञानाहार रेस्टॉरंट उपक्रमाबद्दल मुख्याध्यापिका शीला टेंभरे, श्रीकृष्ण वाकोडे,ओमप्रकाश निमकर्डे, तुलसीदास खिरोडकार,राजेंद्र दिवनाले,सुरेखा हागे, गोपाल मोहे,निखिल गिऱ्हे यांचे शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी कौतुक केले आहे.


नियमित शिकण्याच्या साहित्यासोबत वेगळी शैक्षणिक साधने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्यास ते आनंदाने अभ्यास करतात.

ह्या अनुभवातून ज्ञानाहार रेस्टॉरंट सुरु केले.त्याला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.


---तुलसीदास खिरोडकार

प्रयोगशील शिक्षक, खंडाळा







  🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆                            सन 2024 - 2025  * मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा टप्पा 2 या स्पर्धेत जि.प.व.प्राथमिक मराठी...