Sunday, December 19, 2021

ज्ञानरचनावादी शैक्षणिक प्रदर्शनी

 ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्यातून विद्यार्थ्यांचे शिक्षण गतिमान होते.

केंद्रप्रमुख गजानन गायगोळ यांचे प्रतिपादन


तेल्हारा अकोला दि. १७ डिसेंबर 2021 - शुक्रवार 

कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य शिक्षण गतिमान होण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात असे प्रतिपादन केंद्रप्रमुख गजानन गायगोळ यांनी खंडाळा केंद्रस्तरीय ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य प्रदर्शन प्रसंगी व्यक्त केले.यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका शीला टेंभरे,प्रमुख अतिथी म्हणून गजानन काळपांडे, कलीम सर, नितीन तराळे, सुनीता वानखडे उपस्थित होते.

   तेल्हारा तालुक्यातील खंडाळा केंद्र अंतर्गत येणाऱ्या शाळातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनीमध्ये विविध ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य मांडणी करून उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

याच कार्यक्रमात जिल्हा प्रशासनाद्वारे आयोजित कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत जनजागृती मोहिमेत सहभाग घेणाऱ्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. बालरक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शालेय प्रवाहात आणणार्‍या बालरक्षक श्रीकृष्ण भड, श्रीराम भोपळे, उमेश तिडके, अमोल राखोंडे, प्रमोद दाते, ओमप्रकाश पांडव, तुलसीदास खिरोडकार यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शैक्षणिक संशोधन परिषद पुणे कडून प्राप्त सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

   आयोजित प्रदर्शनीमध्ये खंडाळा केंद्रातील विजय ढोकणे, देविदास कोहरे, दीपक पोके, प्रवीण चोपडे, संजय गासे, श्रीकृष्ण वाकोडे, ओमप्रकाश निमकर्डे, राजेंद्र दिवनाले,प्रमोद रेखाते, संतोष गावंडे, शारिक अली, मो. अन्सार यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन उपक्रमशील शिक्षक गोपाल मोहे तर आभार प्रदर्शन निखिल गिऱ्हे यांनी केले.






Thursday, November 25, 2021

हर घर दस्तक - कोरोना लसीकरण जनजागृती

 


                         




        व्हिडीओ 👇👇


          विदर्भ एक्स्प्रेस न्युज       Click Here


खंडाळा येथे कोरोना लसीकरण जनजागृती 

हर घर दस्तक मोहिम


खंडाळा -

कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी हर घर दस्तक मोहिमेअंतर्गत तेल्हारा तालुक्यातील खंडाळा येथे जनजागृती करण्यात आली. कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेपासून संरक्षण मिळवण्यासाठी लस घेणे अत्यावश्यक आहे. गावात एकही डोज न घेतलेल्या नागरिकांच्या भेटीदरम्यान त्यांचे समुपदेशन जिल्हा ॲम्बॅसेडर जव्वाद हुसेन व तालुका ॲम्बॅसेडर असलम खान पठाण यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

यावेळी लोकांना कोरोना लसीकरणाचे महत्व सांगण्यात आले.आरोग्य उपकेंद्र खंडाळा येथे आज लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी पहिला डोस व दुसरा डोस घेतला.शाळेतील शिक्षक, आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांनी कामकाज पाहिले. यावेळी दोन्ही डोज घेतलेल्या नागरिकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच इतरही लोकांनी लस घ्यावी यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.

      यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष शे. इस्माईल, मुख्याध्यापक शीला टेंभरे, शारिक अली सहायक शिक्षक श्रीकृष्ण वाकोडे, ओमप्रकाश निमकर्डे, तुलसीदास खिरोडकार, सुरेखा हागे, राजेंद्र दिवनाले, गोपाल मोहे, निखिल गिऱ्हे, मो. अन्सार तसेच आशा सेविका मीनाक्षी इंगळे, वंदना तेलगोटे व अंगणवाडी सेविका प्रतिभा गावंडे, वैशाली तायडे, मदतनीस वनमाला गोलाईत, निर्जला अवचार उपस्थित होते.

 नागरिकांना कोरोना लस घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

  🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆                            सन 2024 - 2025  * मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा टप्पा 2 या स्पर्धेत जि.प.व.प्राथमिक मराठी...