Pages
- Home
- शाळा व्य. समिती
- Staff
- लॉकडाऊन उपक्रम
- TV NEWS
- विज्ञान प्रदर्शन /Inspire Project
- उपक्रम व्हिडिओ
- पाठ्यघटक व्हिडिओ
- फ्लिपबुक
- Interactive video
- किशोर मासिक सहभाग
- जीवन शिक्षण मासिक सहभाग
- यशोगाथा
- प्रमाणपत्र टेस्ट
- Online Test 1-4
- Online Test 5-7
- रेडिओ खंडाळा
- आमचे उपक्रम
- स्वाध्यायमाला
- चार्ट
- खंडाळा केंद्र
- नकाशे
- कार्यालयीन अर्ज
- खंडाळा माहिती
- जिल्हा प्रशासन शै. बातम्या
- शिष्यवृत्ती व नवोदय
- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
- फोटो
- 26 जानेवारी 2025
- मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा
Thursday, July 14, 2022
Wednesday, July 13, 2022
शाळा प्रवेशोत्सव 2022 - 2023
माझे शाळेतील पहिले पाऊल --- खंडाळा शाळेचा उपक्रम
विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेऊन शैक्षणिक सत्राची सुरुवात
खंडाळा
दोन वर्षांच्या प्रदीर्घ भीतीदायक कोरोना काळानंतर नव्या शैक्षणिक सत्राची सुरुवात विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेऊन तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषद व शाळा खंडाळा येथे करण्यात आली.
शाळेत आयोजित स्वागत कार्यक्रमात माझे शाळेतील पहिले पाऊल उपक्रम अंतर्गत पहिल्या वर्गात दाखल विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेण्यात आले. हे संचयीका पत्रकात संग्रही ठेवून इयत्ता आठवी नंतर शाळा सोडतांना विद्यार्थ्यांना परत करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी पुस्तक पाटीचे पूजन करून आनंददायी जल्लोषपूर्ण वातावरणात प्रवेश दिंडी काढून विद्यार्थ्यांचे स्वागत करत शाळेत प्रवेश देण्यात आला. गावातील चौकात पालक, प्रतिष्ठित नागरिक यांनी प्रवेश दिंडीचे पूजन करून स्वागत केले. विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके, खाऊ वाटप करून शैक्षणिक कार्याला प्रारंभ करण्यात आला.
प्रवेशोत्सव दिंडीत ग्रामपंचायत उपसरपंच सिंधूताई वानखडे, माजी सरपंच वृषाली देवळे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनकर धुळ, पोलीस पाटील डॉ.अरुण तायडे, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष गजानन वानखडे, सतीश देवळे, विशेष शिक्षक तुषार अढाऊ, पालक, विद्यार्थी मुख्याध्यापिका सौ. शीला टेंभरे, ओमप्रकाश निमकर्डे, श्रीकृष्ण वाकोडे, सुभाष कवटकार, तुळशिदास खिरोडकार, सुरेखा हागे, राजेंद्र दिवनाले, गोपाल मोहे, निखिल गिऱ्हे उपस्थित होते.
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆 सन 2024 - 2025 * मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा टप्पा 2 या स्पर्धेत जि.प.व.प्राथमिक मराठी...
-
समाज शिक्षणाची वाट शिक्षकांनी अंगीकारावी - सत्यपाल महाराज आदर्श जगणं शिकवणाऱ्या शिक्षकांना जागर शिक्षक गौरव पुरस्कार वितरण तेल्हारा विद्य...

