Tuesday, October 13, 2020

घरोघरी स्वयंअध्ययन खंडाळा शाळेचा उपक्रम

 स्वाध्यायमाला स्वयंअध्ययनाला चालना देणाऱ्या --किशोर मुंदडा 


घरोघरी स्वयंअध्ययन खंडाळा शिक्षकांचा ऑफलाईन उपक्रम 


खंडाळा -

प्रतिनिधी 

   कोविड -१९ चा ग्रामीण भागातील वाढता प्रभाव पाहता ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिक्षकांनी तयार केलेल्या स्वाध्यायमाला स्वयंअध्ययनाला चालना देणाऱ्या व शिक्षण सुरू ठेवण्यासाठी पोषक आहेत असे मत तेल्हारा पंचायत समिती सदस्य किशोर मुंदडा यांनी व्यक्त केले .

   घरोघरी स्वयंअध्ययन या उपक्रमाला किशोर मुंदडा यांचे हस्ते साप्ताहिक स्वाध्यायमाला विद्यार्थी वितरणाला प्रारंभ करण्यात आला.

जिल्हा परिषद व.प्राथमिक केंद्रशाळा खंडाळा येथील शिक्षकांकडून इयत्तानिहाय व विषयानुरुप अभ्यासपूर्ण स्वाध्यायमाला तयार करण्यात आल्या आहेत. 

   पाठ्यपुस्तकातील आशयावर आधारित स्वयंअध्ययन उपक्रमाची मांडणी असलेल्या स्वाध्यायाच्या प्रती शाळेत दाखल विद्यार्थ्यांना घरपोच वितरित करण्यात येत आहेत.सोबतच मोहल्ला शाळा , रेडिओ खंडाळा व भिंतीवरचा अभ्यास ह्या उपक्रमाद्वारे कोविड १९ संसर्गजन्य महामारीच्या काळात खंडाळा गावातील विद्यार्थ्यांना शिक्षण सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

   शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण सुरू ठेवण्यासाठी,स्वाध्याय तपासणी व मार्गदर्शन करण्यास केंद्र प्रमुख गजानन गायगोळ, मुख्याध्यापक शीला टेंभरे ,ओमप्रकाश निमकर्डे, श्रीकृष्ण वाकोडे ,सुरेखा हागे ,राजेंद्र दिवनाले ,गोपाल मोहे,निखिल गिऱ्हे,तुलसीदास खिरोडकार यांनी पुढाकार घेतला आहे.शाळेच्या वतीने आयोजित सर्व उपक्रमांना शाळा व्यवस्थापन समिती व पालकांचे मनःपूर्वक सहकार्य मिळत आहे.



No comments:

Post a Comment

नवोदय परीक्षा पूर्वतयारी वर्ग

 *नवोदय वि‌द्यालय प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारी वर्गाचे उ‌द्घाटन*  हिवरखेड (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी,...